शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 20:22 IST

विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता

पुणे/ किरण शिंदे: गुन्हे शाखेच्या पथकाने स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा उध्वस्त केला.  सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून जुगार खेळणाऱ्या 13 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता. 

ताब्यात घेतलेल्या या जुगाऱ्यांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये स्वारगेट पोलिसांना एका गुन्हा पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराचा ही समावेश आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबागेच्या मागे असणाऱ्या नाल्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर रमी पत्ती जुगार चालू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवून छापा टाकत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 14 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई या ठिकाणी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना सापडत नव्हता.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसा