शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

गजानन मारणे व ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला.

गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), सचिन अप्पा ताकवले (वय ३२), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४) आणि अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७) यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तर मेहबूब मोर्तुजा महम्मद सय्यद (वय ३३), राजशेखर यलप्पा बासगे (वय २६), जयवर्धन जयपाल बिरनाळे (वय २४), लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय ४०), सुनील ज्ञानोबा कांबळे (वय ३१), आशिष बापूराव पिसाळ (वय २२) आणि इतर १५० समर्थकांवर गुन्हा दाखल आहे.

गजानन मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड, वारजे, हिंजवडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांपैकी हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाड्यांसह मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करुन समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारणे व त्याच्या साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाही. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

आजपर्यंत पोलिसांनी केलेला तपास

* मिरवणुकीत वापरलेली ११ वाहने निष्पन्न झाली आहेत.

* रॅलीचे उर्से व पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे.

* ८ साक्षीदारांकडे तपास करून त्याचे जबाब नोंदवले आहेत.

* आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथकांची नेमणूक.

* व्हायरल फोटो आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यात येत आहे

आरोपींवर दाखल गुन्हे

* गजानन मारणे- २३

* रूपेश मारणे- १२

* सुनील बनसोडे - १४