शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:06 IST

पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी

ठळक मुद्देकोंढवा येथे जलवाहिनीचे उद्घाटन

पुणे : पुणे शहराचा झपाट्याने विकास होत असून, शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिले. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्र. २६ येथील ४.५ किलोमीटर ५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी व श्री गुरू नानकदेवजी उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर तसेच लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘उद्याने ही शहरांची फुफ्फुसे आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर घनकचरा वर्गीकरण व विघटन करणे आवश्यक आहे. पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी देण्यात येत असून जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सव होण्यासाठीही सहकार्य करण्यात येत आहे.’’०००नागरिकांनी खबरदारी घ्यावीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना देत, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. यामुळे नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, हस्तांदोलन करू नये, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा अशा सूचना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारKondhvaकोंढवाChetan Tupeचेतन तुपेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका