शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र नृसिंहपूरच्या विकासासाठी निधी देणार

By admin | Updated: October 30, 2015 00:04 IST

पवित्र तीर्थक्षेत्र नीरा-नृसिंहपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांचा विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध केला जाईल

बावडा : पवित्र तीर्थक्षेत्र नीरा-नृसिंहपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांचा विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे नीरा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते आज करण्यात आले. बापट म्हणाले, की श्री नृसिंहाच्या पवित्र, धार्मिक, सांस्कृतिक ठिकाणी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य लाभले. देव स्वत: खात नाही. दुसऱ्यास आत्मविश्वासस्वरूपी आशीर्वाद देतो. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेले हे तीर्थक्षेत्र आगामी दोन-तीन वर्षांत नावारूपास आणू. इतकेच नव्हे, तर एक नंबरचे तीर्थक्षेत्र बनवू. यासाठी कितीही खर्च झाला तरी मागे हटणार नाही. राज्याचा विकास करीत असताना प्रसंगी कर्ज काढावे लागले, तरीही विकासकामे थांबू देणार नाही. भाजपा-सेना सरकार एक वर्ष पूर्ण करीत असतानाच कोट्यवधीची विकासकामे घडवून आणली आहेत. या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा २७५ कोटींवर नेला असून, तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहे. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा दुसऱ्याचा सन्मान करण्यास शिकावे. भरणे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे हे तीर्थक्षेत्र कुलदैवत असल्याने त्यांनी येथील विकासकामे तातडीने हाती घेतली आहेत. या ठिकाणी भीमा नदीवर बंधारा बांधण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाईल. प्रास्ताविक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे म्हणाले, की या पुलासाठी नाबार्डकडून आठ कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. सुमारे पाच महिन्यांतच काम पूर्ण होईल. या पुलाची अठरा मीटर लांबी आहे. नीरा-नृसिंहपूर परिसरातील तीर्थक्षेत्राची कामे दर्जेदार करू. या वेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, बाबासाहेब चवरे, महेश इंगळे आदींची भाषणे झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली चौरे, सभापती सोनाली ननवरे, इंदापूरचे बांधकाम उपअभियंता लक्ष्मीकांत जाधव, शाखा अभियंता सावळे, उमेश घोगरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ मोरे, सरपंच रूपाली काळे आदी उपस्थित होते. या वेळी या पुलासाठी शेतातून जागा दिल्याबद्दल केशवराव काटे, विठ्ठलराव काटे, यशवंत काटे-देशमुख, ठेकेदार श्रीमंत तांदुळकर व शिवाजी थोरवे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.