शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोस्त आपुला पाऊस आला, उघडा खिडके दारे! ना कडकडाट ना गडगडाट ‘तो’ बसरतोय शांतपणे

By श्रीकिशन काळे | Updated: June 25, 2023 13:22 IST

उशीरा का होईना, पण सर्वांचा दोस्त असणारा पाऊस सुटीच्या दिवशी पुण्यात अवतरला

पुणे : उशीरा का होईना, पण सर्वांचा दोस्त असणारा पाऊस सुटीच्या दिवशी पुण्यात अवतरला आहे. नेहमीप्रमाणे येणारा मॉन्सून यंदा रविवार पाहूनच आला आहे. त्यामुळे मनसोक्त आणि मनमुक्त तो बरसत आहे. हवामान खात्याने आज जाहीर केले की, मॉन्सून पुण्यात आला. त्यामुळे आता पुणेकरांना चिंता नाही. कसलाही गडगडाट व कडकडाट न करता शांतपणे सकाळीच बरसायला सुरवात झाली आहे.

कधी येणार मॉन्सून ? असा सतत पुणेकरांना छळणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने आज दिले आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस शनिवारी आला आणि त्यानंतर रविवारी मॉन्सून अधिकृत आल्याची घोषणा हवामान खात्याचे महासंचालक अनुपम कश्यमी यांनी केली. गेले कित्येक दिवस निरभ्र असणारे आकाश आता संपूर्ण काळ्याशार जांभुळ पिकल्यावानी भरून गेले आहे. विजांचा कडकडाट न करताच सकाळपासून ‘तो’ बरसत आहे. कोणताही गाजावाजा न करता उशीरा आल्यावर कोणी कसे निमूटपणे येते, अगदीच तसेच अवचित येऊन हा पाऊस कोसळत आहे. 

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्येही शनिवारपासून त्याने चांगली हजेरी लावली आहे. घाटात आणि धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. लोणावळा परिसरात शनिवारी ५४ मिमी पावसाची नोंद झाली. तर शिरगाव ३० मिमी, भिवपुरी ६६, कोयना ३२, खोपलोली ५८, ताम्हिणी ५६ अशी पावसाची नोंद झाली आहे.सध्या मॉन्सून अतिशय स्ट्रॉग असून, तो आज दिवसभर बसरणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. मॉन्सूनने शनिवारपासून चांगला वेग पकडला असून, संपूर्ण भारतात तो पसरत आहे. जवळपास ९० टक्के त्याने भारत व्यापला आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस

लोणावळा : ६१ मिमीलवासा ३४.५ मिमीबारामती २६.६ मिमीमाळीण २०.० मिमीपाषाण १८.० मिमीहडपसर १५.० मिमीशिवाजीनगर १४.५ मिमीकोरेगाव पार्क १४.०दौंड १३.५ मिमीचिंचवड १२.५ मिमीवडगाव शेरी १२.० मिमीहवेली ९.५ मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणenvironmentपर्यावरणHealthआरोग्य