पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 11:43 AM2020-04-02T11:43:23+5:302020-04-02T11:45:23+5:30

लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार

Free grain distribution of PM's poor welfare scheme started in Pune district | पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू 

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू 

Next
ठळक मुद्देप्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात वाटप

पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली आहे. या योजनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा ग्रामीण भागासाठी एप्रिल, मे व जून २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियमानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल २०२० करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ आणि मे व जून २०२० या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २५ किलो गहु व १० किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति लाभार्थ्यांकरीता दरमहा ३ किलो गहु व २ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत २ रुपये प्रति किलो तर तांदुळ ३ रुपये प्रति किलो आहे.
एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा ५ किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Free grain distribution of PM's poor welfare scheme started in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.