शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी मोफत चारा

By admin | Updated: October 31, 2015 01:10 IST

बोरी बुद्रूक येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला, अशी माहिती दुगार्माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

राजुरी : बोरी बुद्रूक येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला, अशी माहिती दुगार्माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव दरवर्षी नवरात्रात सामाजिक उपक्रम राबवतात. या मंडळांनी याही वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील हरेश्वर कर्जुले या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सुमारे ३ ट्रक ऊस, तसेच १ ट्रक हत्तीगवताचा असे ४ चार ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला. तसेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ ही संस्थेला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत म्हणून नवरात्रात दहा दिवस दानपेटीत जमा झालेली रक्कम या संस्थेकडे डी.डी.ने पाठविण्यात आली. हा चारा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली खंडागळे व बोरी बुद्रक गावच्या सरपंच पुष्पा कोरडे यांच्या हस्ते पाठविण्यात आला. (वार्ताहर)