Pune Crime: आठ लाखांचा माल ‘मॅनेज’ करून म्हणाला चोरी झाली!
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 26, 2023 18:39 IST2023-07-26T18:38:40+5:302023-07-26T18:39:08+5:30
८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक...

Pune Crime: आठ लाखांचा माल ‘मॅनेज’ करून म्हणाला चोरी झाली!
पुणे : एका नामांकित कंपनीच्या शोरूम मध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने चोरी झाल्याचे भासवून तब्बल ८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवार पेठ परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर विनोद स्वामी (वय ३६, रा. येरवडा) हा २ ते ३ वर्षांपासून शोरूम मध्ये मॅनेजर पदावर कामासाठी होता. फिर्यादी सर्वज्ञ नंदू माथूर (वय २८, रा. विमाननगर) यांनी शोरूम मध्ये असलेल्या सामानाचे ऑडिट केले असता ८ लाख ३० हजारांचा माल कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शोरूमच्या मॅनेजरला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत सामान चोरीला गेले आहे असे कारण सांगितले. मात्र अधिक तपास केला असता सामानाची गफलत त्यानेच केली असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात मयूर स्वामी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग पुढील तपास करत आहेत.