Pune: सुभेदार पदाच्या वर्दीचा वापर करुन फसवणूक; लष्करातील भगोडा हवालदार जेरबंद

By विवेक भुसे | Published: June 19, 2023 02:39 PM2023-06-19T14:39:33+5:302023-06-19T14:40:41+5:30

पाटील याच्यावर यापूर्वीही महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेल्याचा गुन्हा दाखल आहे...

Fraud using the uniform of Subhadar post; Fugitive army constable jailed | Pune: सुभेदार पदाच्या वर्दीचा वापर करुन फसवणूक; लष्करातील भगोडा हवालदार जेरबंद

Pune: सुभेदार पदाच्या वर्दीचा वापर करुन फसवणूक; लष्करातील भगोडा हवालदार जेरबंद

googlenewsNext

पुणे : मेजर असल्याचे सांगत लष्करी गणवेश घालून फिरणार्या लष्करातील भगोडा हवालदाराला खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून सदर्न कमांड च्या पत्त्यावरील ३ बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, आय फोन सह दोन मोबाईल, भारतीय सैन्य दलाचे दोन गणवेश, इतर साहित्य, बनावट ओळखपत्र, गणवेश असलेले चार कलर फोटो असे साहित्य जप्त केले आहे.

प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मुळ रा. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पाटील याच्यावर यापूर्वीही महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेल्याचा गुन्हा दाखल आहे. अहमदनगरमधील एम आय डी सी पोलीस ठाणे, देहुरोड, वाकड, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २०२०, २०२१ मध्ये गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील हा २०१९ पासून भारतीय सैन दलाचे पॅरा मिलिटरी फोर्स आसाम रायफलमधून लेस हवालदार पदाची नोकरी सोडून पळून आला आहे. लष्करच्या गुप्तचर विभागाने शहर पोलीस दलाला प्रशांत पाटील याच्याविषयी तक्रार अर्ज देऊन कारवाई करण्याविषयी कळविले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांचे सहकारी यांनी मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाच्या मदतीने शोध घेत होते. त्याने खडकी येथील दुकानदार निवृत्त सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफार्म व इतर साहित्य घेऊन पैसे न देता ४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली होती. तो सदर्न कमांड येथे कार्यरत असल्याचे भासवून लष्कराचा गणवेश घालून त्याने फोटो काढले होते. तसेच त्याचे बनावट आय डी वापरुन सदर्न कमांड येथील मुख्यालयाच्या परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवत होता.

सदर्न कमांड येथे रहात नसतानाही या कार्यालयाचा वापर करुन बनावट आधार कार्ड तसेच पॅन कार्ड व ओळखपत्र तयार करुन फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. तो सतत लोकेशन बदलून स्वत:ची ओळख लपवत होता. खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व त्यांच्या सहकार्यांनी केली

Web Title: Fraud using the uniform of Subhadar post; Fugitive army constable jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.