शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून बँकेसह ग्राहकांच्या तब्बल २९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 11:18 AM

विमान तिकिटांच्या खरेदीसाठी केला पैशांचा वापर

ठळक मुद्देबँक आणि ग्राहक दोघांचे पैसे गेल्याने प्रकार आला उघडकीस

पिंपरी: क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपयांची विमानाची तिकिटे खरेदी केली. यात आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकाची व बँकेची फसवणूक झाली आहे. हिंजवडी येथे २४ डिसेंबर २०२० ला ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला.

आयसीआयसीआय बँकेचे हिंजवडी येथील डेप्युटी मॅनेजर मिलिकअर्जून परमेश्वर नंदर्गी (वय ४०) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदर्गी यांच्या आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडिट कार्डची माहिती अज्ञात आरोपींनी संगणक यंत्रणेचा वापर करून हॅक केली. तसेच घाडगे यांच्या क्रेडिट कार्डवरून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपयांचा वापर विमानाचे तिकीट खरेदी करण्यासाठी करून बँक व ग्राहकाची फसवणूक केली.  हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजी