शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कर्जासाठी बिटकॉईन खरेदी करायला लावून १७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : व्यवसायवृद्धीसाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी बिटकॉईन खरेदी करायला लावले. त्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : व्यवसायवृद्धीसाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी बिटकॉईन खरेदी करायला लावले. त्यानंतर ते बिटकॉईन परस्पर विकत दोघांची तब्बल १७ लाख ५१ हजार २६२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हितेश बुल्डे (रा. अहमदाबाद) आणि जिग्नेश सोनी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुरज यदूराज सूर्यवंशी (वय ४५, रा. जनवाडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी यांचा एच. एस. गारमेन्ट नावाने कोथरुड येथे व्यवसाय आहे. त्यांचे मित्र नागनाथ परकाळे (रा. कोथरुड) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोघांना व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. त्यांच्या ओळखीच्या जिग्नेश सोनी यांने हितेश बुल्डे यांच्याशी स्वारगेट येथील नटराज हॉटेलमध्ये भेट करुन दिली. तुम्हाला प्रत्येकी ५ कोटींचे कर्ज हवे असेल तुम्हाला बिटकॉईन खरेदीचे व्यवहार दाखवावे लागतील. तेव्हा दोघांनी त्याच्याकडून बिटकॉईन व्यवहारासाठी मोबाईल ॲपलिकेशन डाऊनलोड करुन घेतले. त्यानंतर त्यांनी बिटकॉईनचा व्यवहार सुरु केला. एक दिवस हितेश यांचा सूर्यवंशी यांना फोन आला. तुमचा १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण झाला आहे. पण परकाळे यांच्या १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे खात्यावर पैसे कमी असल्याने तुमच्या खात्यावरील काही पैसे परकाळे यांच्या खात्यावर पाठवून १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करु असे सांगून त्यांच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेतला. काही वेळातच सूर्यवंशी यांच्या खात्यातील सर्व १० लाख १६ हजार ९११ रुपये परकाळे यांच्या खात्यात जाऊन सूर्यवंशी यांचे खाते रिकामे झाले. त्यावर हितेश यांनी चुकून झाले. परकाळे यांच्या खात्यातून उरलेले पैसे तुमच्या खात्यात परत करतो, असे सांगितले. त्यानंतर परकाळे यांना असे सांगून तुमच्या खात्यावर आलेले सूर्यवंशी यांचे पैसे परत पाठविण्यासाठी त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेतला. त्यांच्या खात्यावरील त्यांचे ७ लाख ३४ हजार ३५१ रुपये व सूर्यवंशी याचे पैसे असे १७ लाख ५१ हजार २६२ रुपये तिसर्याच खात्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी वारंवार पैसे परत करण्यास सांगितले. अगदी अहमदाबाद येथे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.