लॉगिन पिन रिसेटच्या नावे ॲप टाकून महिलेची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: July 10, 2024 06:18 PM2024-07-10T18:18:58+5:302024-07-10T18:19:46+5:30

महिलेने दिलेल्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले

Fraud of a woman by putting an app in the name of login pinpin reset | लॉगिन पिन रिसेटच्या नावे ॲप टाकून महिलेची फसवणूक

लॉगिन पिन रिसेटच्या नावे ॲप टाकून महिलेची फसवणूक

पुणे: लॉगिन पिन रिसेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ०९) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३ जून रोजी घडला आहे. याबाबत मोहम्मदवाडी परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला बँकेसारख्या दिसणाऱ्या नावावरून मेसेज आला. "तुमचे युनियन बँकेचे मोबाईल अप्लिकेशनचे पिन रिसेट करण्याची आवश्यकता आहे" असा मजकूर होता. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलवर एक अनोळखी अप्लिकेशन डाउनलोड झाले. त्यामध्ये त्यांनी बँकेची खासगी माहिती टाकली. त्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.

Web Title: Fraud of a woman by putting an app in the name of login pinpin reset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.