शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

उतारवयात जोडीदाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीची १६ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 5:43 PM

ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांचा डल्ला

पुणे : उतारवयात सोबत असावी, म्हणून एका ज्येष्ठ नागरिकाने केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. तरी दुसऱ्या संकेतस्थळावर नावनोंदणी करायला लावत स्थळ दाखविण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी त्यांना तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी वाघोली येथील एका ६३ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वीज मंडळातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे पत्नी व मुलांशी पटत नसल्याने ते वेगळे राहतात. उतारवयात कोणीतरी सोबत असावे, यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती. त्यानंतर त्यांच्याशी लव्ह इन या संकेतस्थळावरून संपर्क साधण्यात आला.

नावनोंदणीसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून त्यांना स्थळ दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार ५७९ रुपये ऑनलाईन घेतले. मात्र कोणतेही स्थळ दाखविले नाही अथवा पैसे परत न करता फसवणूक केली. लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी