पुणे : प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने तरुण सराफा व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल १२ पानी सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली आहे. ही घटना ६ मार्च रोजी फुरसुंगी परिसरात घडली. प्रतिक राजेंद्र मेमाणे (वय २९, रा. फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील राजेंद्र मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रेया दादासो खोपडे देशमुख (शिक्केकरी) (रा. आंबेड, भोर) हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक याचे फुरसुंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची श्रेयाशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. श्रेयाने लग्नाचे आश्वासन देत प्रतीकला विश्वासात घेतले. प्रतीकने तिला सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, कपडे तसेच इतर भेटवस्तू दिल्या होत्या. दरम्यान, श्रेयाने स्वतःला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून प्रतिकची सहानुभूती मिळवली. तरीही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. मात्र, श्रेया सतत काही ना काही कारणे सांगून भेट टाळत होती. या प्रकारामुळे मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर प्रतीकने टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या १२ पानी सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्यावर झालेल्या फसवणुकीबाबत सविस्तर उल्लेख केल्याची माहिती आहे. सुरुवातीला फुरसुंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आता श्रेयाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A Pune businessman, betrayed by a woman promising marriage, tragically committed suicide. He detailed the fraud in a 12-page note, accusing her of deceit and causing immense mental distress. Police are investigating the case.
Web Summary : पुणे में एक व्यवसायी ने शादी का वादा करके धोखा देने वाली महिला से तंग आकर आत्महत्या कर ली। उसने 12 पन्नों के नोट में धोखाधड़ी का विवरण दिया, उस पर धोखा देने और मानसिक पीड़ा पहुंचाने का आरोप लगाया। पुलिस जांच कर रही है।