शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:29 IST

कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर

पिंपरी : कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी काही सायबर चोरटे सक्रिय झाले असून, त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.

कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. बनावट वेबसाइट, लिंक किंवा इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करतात.ही बाब भारत सरकार गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे. बनावट वेबसाइटद्वारे कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइटचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच ऑनलाइन बुकिंगद्वारे फसवणूक करण्याकरिता भाविकांसाठी निवास व्यवस्था, दर्शन पास इत्यादी बुकिंगच्या नावाखाली बनावट वेबसाइटद्वारे पैसे उकळले जात आहेत.

ही घ्या खबरदारी- बनावट लिंक टाळा : कुंभमेळासंबंधी बनावट लिंक, बेवसाइट्स किंवा मेसेजवर क्लिक करू नका.

- सत्यता तपासा : कुंभमेळासंबंधी अधिक माहितीसाठी https://kumbh.gov.in अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.

- आपली गोपनीय माहिती शेअर करू नका : बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका.

- फसवणुकीचा संशय आल्यास सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रKumbh Melaकुंभ मेळाCrime Newsगुन्हेगारी