शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 18:15 IST

मुलाचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात

धायरी : पाण्याची मोटार चालू करायला गेलेल्या चौदा वर्षीय मुलाला विजेचा शॉक  लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रणव रोहिदास निवंगुणे  (वय: १४ वर्षे, रा. निवृत्ती नगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील चरवड वस्ती येथे येथे प्रणव आपल्या कुटुंबासोबत राहतो. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रणव घरातील पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेला होता. विद्युत मोटार चालू केल्यानंतर मोटारीचा विद्युतप्रवाह लोखंडी जिन्यात उतरला. दरम्यान प्रणवचा जिन्याला धक्का लागल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला. या विजेच्या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव हा काशिनाथ खुटवड मेमोरियल स्कूल आंबेगाव बुद्रुक येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूelectricityवीजPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी