शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमध्ये चौदा वाहनांना आग; एका चारचाकीसह तेरा दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 12:36 IST

रविवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

धनकवडी : आंबेगाव खुर्द, बालाजी ग्रीन पार्क येथील साई प्रसाद अपार्टमेंट च्या पार्किंगमध्ये चौदा वाहनांनी पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एका चारचाकी वाहनासह तेरा दुचाकींचा समावेश आहे.

आंबेगाव खुर्द दरी पुलाजवळ साई प्रसाद अपार्टमेंट असून या अपार्टमेंट मध्ये दहा फ्लॅट आहेत. या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. यामध्ये इतर चौदा वाहनांनीही पेट घेतला. 

वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, कात्रज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवत असताना वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकलेले नाही. तसेच या घटनेत कोणीतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची अशी माहिती कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. रविवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :DhankawadiधनकवडीfireआगPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलAccidentअपघातbikeबाईक