चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार

By Admin | Updated: June 21, 2014 22:30 IST2014-06-21T22:30:50+5:302014-06-21T22:30:50+5:30

संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 रोजी पुरंदर तालुक्यामध्ये विसावणार आहे.

Fourteen thousand liters of kerosene will be distributed | चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार

चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार

>जेजुरी : संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 रोजी पुरंदर तालुक्यामध्ये विसावणार आहे. पुरंदर तालुक्यामध्ये सासवड, जेजुरी, वाल्हे, सुकलंवाडी या तीन दिवसाच्या मुक्कामामध्ये तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी वैष्णवासाठी राखीव कोटय़ामधून 24 हजार लिटर रॉकेलचे वाटप करण्यात येणार असून सासवड, जेजुरी, वाल्हे, सुकलंवाडी या गावामधून केरोसिनचे वाटप होणार आहे. 
सासवड शहरामध्ये आर.जी.चव्हाण, पालखी तळ हाड्को नित्योपयोगी अमर चौक, विलास वारघडे धान्य बाजार सासवड, सुनिल वढणो लांडगे आळी, राजेंद्र महाजन भाजी मंडई, डंका प्रोव्हिजन मेन रोड सासवड, आदी ठिकाणावरून वाटप होणार आहे. जेजुरी शहरामध्ये सदाशिव गोपाळ आणि कंपनी बाजार पेठ जेजुरी, डी.डी.सोनवणो धालेवाडी रोड, राजयोग ट्रेडिंग कंपनी मोरगाव रोड, स्मिता वीरकर नगरपालिका समोर भारत आणि कंपनी जानुबाई आळी, नंदकुमार निरगुडे नगरपालिकेसमोर, ए.एस.भालेराव पाणी पुरवठा केंद्र, रमेश लेंडे लवथळेश्वर मंदिराशेजारी इत्यादी ठिकाणातून वाटप 
होणार आहे.  (वार्ताहर)
 
4वाल्हे गावामध्ये विष्णू नारायण भुजबळ माळवाडी वाल्हा, शिवाजी जाधव एस. टी .थांबा वाल्हा, व्ही. एस. भुजबळ सुकलंवाडी पालखी तळ आदी ठिकाणावरून वाटप होणार असल्याचे पुरवठा अधिकारी जगताप सी. डी. जगताप व पुरवठा निरीक्षक बी. एन. पठाण 
यांनी सांगितले. 

Web Title: Fourteen thousand liters of kerosene will be distributed