शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:44 IST

पिंपरी चिंचवड पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरात वाहनचोरी सुरूच सोमवारी,  सात दुचाकी,

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. इतके दिवस चारचाकी, दुचाकी यांच्या चोरीने पिंपरी चिंचवडकर हैराण झाले होते. मात्र, याच दरम्यान पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या आणखी चिंतेत भर पडली आहे. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

शहरात दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात असून वाहनचोर भरदिवसाही वाहनांची चोरी करू लागले आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यांत वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीप्रकरणी पिंपरी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण भोसरी, निगडी या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमित एकनाथ चव्हाण (वय ३२, रा. चिंचवड) यांनी दुचाकी चोरी प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांनी त्यांची दुचाकी १६ जुलै रोजी थरमॅक्स चौकात पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.

अमोल मोहन हांडे (वय ३२, रा. दिघी रोड भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जून रोजी भोसरी येथिल सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

चाकण पोलिस ठाण्यात योगेश राधाकिशन पगारे (वय ४०, रा. खालुंब्रे) यांनी वाहन चोरीची फिर्याद दिली आहे. पगारे यांची १७ जुलै रोजी त्यांची दुचाकी घरासोमेर हॅन्डेल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

विशाल दत्तात्रय दवणे (वय १९, रा. दवणेवस्ती) यांनीही वाहन चोरीबाबत चाकण पोलिस फिर्याद दिली आहे. दवणे यांची दुचाकी ११ जुलै रोजी घारसमोर अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

शैलेश चिदानंद दोडमणी (वय ३५, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दोडमणी यांनी ९ जुलै रोजी टाटा मोटर्स कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने तेथून दुचाकी चोरून नेली.

सौफन मोफीजुल शेख (वय १८, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किवळे यांनी १६ जुलै रोजी किवळे येथिल जयभवानी मटन अण्ड चिकन शॉप समोर दुटाकी पार्क केली असता चोरट्याने ती चोरून नेली.

गणेश मुरलीधर रणधिर (वय २९, रा. गहुंजे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रणधिर यांनी आपल्या घराच्या समोर दुचाकी पार्क केली असता चोरट्याने चोरून नेली. तसेच दुचाकीच्या सिटखाली असलेली दुचाकीची मुळ कागदपत्रेही चोरट्याने चोरून नेली. 

चिंचवड येथून एकाच व्यक्तीच्या दोन सायकलची चोरी...चिंचवड येथे बाजीराव सदाशिव नाईक (वय ४२, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्य घराच्या पार्किंगमधून दोन सायकलची चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांनी चिचंवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायकल चोरीचा हा प्रकार सात ते १५ जुलै दरम्यान घडला आहे. अज्ञात व्यक्तीने नाईक यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेली चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमत असलेल्या दोन सायकल चोरून नेल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCyclingसायकलिंगtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी