पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:54 IST2019-07-10T16:49:02+5:302019-07-10T16:54:41+5:30
नाे पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीला लावलेला जॅमर चालकाने चाेरुन नेल्याची घटना समाेर आली आहे.

पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन
पुणेः नाे पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीला वाहतूक पाेलिसांनी जॅमर लावला. चालकाने दंड भरण्याऐवजी थेट जॅमरच चाेरुन नेल्याची घटना पुणे- साेलापूर रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घटली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच 12 पीएच 7513 ही चारचाकी गाडी एका अज्ञात वाहनचालकाने पुणे- साेलापूर रस्त्यावरील हाॅटेल प्रेसिंडेंट समाेर फुटपाथवर लावली हाेती. त्यामुळे तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा निर्माण हाेत हाेता. ही बाबा हडपसर वाहतुक विभागाचे पाेलीस शिपाई शिवाजी चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या वाहनावर कारवाई करत वाहनाला जॅमर लावला. व ते पुढील कारवाईसाठी गेले.
चारचाकीच्या चालकाने दंडाची रक्कम न भरता बेकायदेशीरपणे चारचाकीला लावलेला 2500 रुपयांचा जॅमर काढून चाेरुन नेला आहे. याप्रकरणी चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हडपसर पाेलीस तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जॅमर चाेरुन नेल्याच्या घटना वाढल्या असून पाेलिसांसाठी डाेकेदुखी ठरत आहे.