शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

धायरीमध्ये दुभाजकाला धडकून चारचाकीचा अपघात; पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे घडताहेत सतत दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:07 PM

Accident : ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या परिसरात दुभाजकाला  धडकून आत्तापर्यंत १५ ते १६ अपघात झाले आहेत.

धायरी : महापालिकेच्यावतीने धायरी गाव ते धायरी फाटा दरम्यान रस्त्याच्यामध्ये बसविण्यात आलेल्या लोखंडी दुभाजकाला चारचाकी वाहनाची धडक बसल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामधे कोणाला मोठी दुखापत झाली नाही. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या परिसरात दुभाजकाला  धडकून आत्तापर्यंत १५ ते १६ अपघात झाले आहेत.

महापालिकेच्या वतीने धायरी गाव ते धायरी फाटा दरम्यान रस्त्याच्या मध्ये लोखंडी दुभाजक बसविण्यात आले आहेत. मात्र रस्ता अरूंद असल्याने एका बाजूच्या रस्त्याला ओव्हरटेक करीत असताना रात्रीच्या वेळेला वाहनाच्या उजेडात दुभाजक व्यवस्थित दिसत नसल्याने आत्तापर्यंत १५ ते १६ अपघात या परिसरात घडले आहेत.

स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार करूनही महापालिकेने याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून येते आहे. शिवसेना विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. 

अपघात होऊन निम्मे दुभाजक गायब...या परिसरात दुभाजकाला धडकून सतत अपघात होत असल्याने काही दुभाजक निघून पडल्याने गायब झाले आहेत. तर काही ठिकाणी असलेले दुभाजक काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात