जुलूस मिरवणुकीत चार जणांना विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी; वडगावशेरीतील आनंद पार्कमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 12:08 IST2024-09-22T12:01:19+5:302024-09-22T12:08:32+5:30

वडगाव शेरी परिसरातील जवळपास २६ हून  अधिक जुलूस मिरवणुका रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Four persons seriously injured by electric shock during the procession Incident at Anand Park in Vadgaonsheri  | जुलूस मिरवणुकीत चार जणांना विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी; वडगावशेरीतील आनंद पार्कमधील घटना 

जुलूस मिरवणुकीत चार जणांना विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी; वडगावशेरीतील आनंद पार्कमधील घटना 

चंदननगर: वडगाव शेरीमधील जुलूस मिरवणुकीमध्ये चार जणांना शॉक लागण्याची घटना आज ११ वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये चार जण पूर्णपणे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगावशेरी आनंद पार्क परिसरामध्ये आज सकाळपासून जुलूस मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये झेंडे फडकवताना वरती लटकणाऱ्या विजेच्या तारांना झेंडा लागल्याने करंट झेंड्यांमध्ये उतरून झेंडा फडकवणाऱ्या चार तरुणांना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे वडगाव शेरी परिसरातील जवळपास २६ हून  अधिक जुलूस मिरवणुका रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Four persons seriously injured by electric shock during the procession Incident at Anand Park in Vadgaonsheri 

टॅग्स :Puneपुणे