सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 17:36 IST2021-05-09T17:35:41+5:302021-05-09T17:36:32+5:30
जाब विचारल्याने केला होता छळ

सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे: सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित यांच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्नेहा अभिजीत शिवरकर (वय ३७, रा. जांभुळकर मळा, फातिमानगर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत शिवरकर (वय ६९), मुलगा अभिजीत (वय ३८), सासू कविता (वय ६६), आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्यांना मधुमेह असल्यामुळे तसेच पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा जाब फिर्यादीने विचारल्यामुळे मारहाण करुन छळ करण्यात आला. तसेच मारण्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे स्नेहा शिवरकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार नोव्हेंबर २००९ पासून ते एप्रिल २०१९ पर्यंत सुरु असल्याचे त्यात म्हटले आहे.