Four months pregnant wife murdered by husband on suspicion of afairs ; Events at Junnar | चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; जुन्नर येथील घटना

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; जुन्नर येथील घटना

ठळक मुद्देया तपासादरम्यान पती संजय माळी याच्या अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्याने लक्ष केंद्रित

नारायणगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चार महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कांदळी ( ता. जुन्नर ) येथील उबरकास मळा येथे सोमवारी ( दि. ६ ) दुपारी ३ ते ५ वा सुमारास घडली.  दरम्यान, पत्नीवर बलात्कार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा देखावा पतीने केला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना देखील तसेच वाटले होते. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर पतीनेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.  या खूनप्रकरणी मयत महिलेचे वडील शाम बापु फुलमाळी(रा. उबरकास मळा, कांदळी) यांनी फिर्याद दिली आहे . 
कविता संजय माळी  (वय २२ ) रा. उबरकास मळा , कांदळी ता.जुन्नर जि.पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे . या खुनप्रकरणी पती संजय माळी याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , शाम फुलमाळी हे कांदळी येथे वाट्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करत आहेत. त्यांच्या घराच्या शेजारीच विवाहित मुलगी कविता आणि जावई संजय माळी हे राहत होते. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे .
काल ( दि ६ ) दुपारी ३ वा सुमारास कविता हिने मका कापून घरी घेऊन गेली , काही वेळाने वडिलांना कविता ही शेतातील रोडने विरोबा मंदिराकडे जात असताना दिसून आली होती . बराच वेळ वाट पाहून कविता घरी आली नसल्याने तिचे वडील ,भाऊ यांनी शोध घेतला असता ५ वा सुमारास विशाल कुतळ यांच्या उसाच्या सरीमध्ये कविता हिचा मृतदेह आढळून आला. यावेळी कविताच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते. बाजुलाच एक तंबाखुची पुडी, एक चुनापुडी, एक आढळून आली. 
या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे व पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली असता महिलेच्या मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठीचा कागद हा संजय माळी यांच्या घरातील एका वहीचा कागद असल्याचे प्रथम निदर्शनास आले. आढळलेल्या चिठ्ठीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने कवितांच्या चारित्र्याविषयी वाईट लिहिले होते. कवितांचा शोध घेत असताना संजय माळी याने मला अंगात येऊन देवाने कविता एका उसाच्या शेतात आहे असा दृष्टांत दिला आहे असे सांगितले.त्यावरून नातेवाईकांनी जवळील उसाच्या शेतात शोध घेतला असता  कविताचा मृतदेह आढळून आला होता.
 या तपासादरम्यान तसेच अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पती संजय माळी याचेवर लक्ष केंद्रित करून त्यास ताब्यात घेतल्या नंतर खुनाचा कट त्यानेच केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले .या पुढील तपास अर्जुन घोडे पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत .

Web Title: Four months pregnant wife murdered by husband on suspicion of afairs ; Events at Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.