शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:47 IST

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे

पुणे : वृत्तपत्रातून बदनामी करण्याची तसेच खूनाची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या एका महिलेस ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चौघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच योगेश नागपूरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश तांबे आणि  योगेश नागपूरे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका गोदामात २३  आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे. प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर हे थांबले होते. प्रमोद साळुंखे याने एका इंग्रजी वृत्तपत्र व आत्मज्योती पेपरचा पत्रकार असल्याचे सांगितले. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करुन दोन नंबरचा धंदा करता. यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खूप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करुन पूर्णपणे बरबाद करुन टाकतो. जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खूनच करुन टाकतो,  अशी धमकी दिली. फियार्दी यांच्या मुलाला हाताने मारहाण केली. पत्नी व मुलाला गोदामाच्या बाहेर पडण्यास अटकाव केला. प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद यांनी स्वत:साठी व त्यांचे साथीदार मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर व आत्मज्योती पेपरच्या संपादक संजिवनी कदम यांच्यासाठी फियार्दी यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी जबरदस्तीने वसुल करुन निघून गेले. फियार्दी हे या प्रकाराने घाबरून गेले होते. त्यांनी मंगळवारी रात्री ही बाब मुंढवा पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन तातडीने आरोपींचा शोध घेऊन मध्यरात्रीनंतर चौघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJournalistपत्रकारArrestअटकMONEYपैसा