मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 08:38 IST2019-11-29T08:37:15+5:302019-11-29T08:38:42+5:30

जखमींवर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू

four died and two critically injured in accident on mumbai pune express way | मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

पनवेल: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्विफ्ट कारनं टँकरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला.

साताऱ्यातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या स्विफ्टनं एका टँकरला मागून जोरदार धडक दिली. त्यात स्विफ्टमधील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अपघात झाल्यानंतर रोडवेज पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, हायवे पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, रसायनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना त्वरित पनवेलच्या रुग्णालयात दाखल केलं. 
 

Web Title: four died and two critically injured in accident on mumbai pune express way

टॅग्स :Accidentअपघात