शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चारच नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 3:25 AM

जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनामुळे पुणे महापालिकेची सभा तहकूब

पुणे : पर्यावरण अहवालावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या सभेला अवघे चार नगरसेवक आणि उपमहापौर उपस्थित होते. माजी संरक्षण मंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनामुळे सभा तहकूब होणार असल्याची कल्पना असतानाही नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी पालिकेत येण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे ‘माननियां’वर टीका होऊ लागली आहे.प्रशासनाने शहरातील पर्यावरणाचा अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल जुलै २०१८ मध्ये पालिका सभागृहासमोर ठेवण्यात आल्यापासून पर्यावरणाची खास सभा वेगवेगळी कारणे देत तहकूब करुन पुढे ढकलण्यात येत आहे. पर्यावरणाची तहकूब सभा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या नवीन सभागृहामध्ये बोलावली होती. जॉर्ज फर्नांडीस यांचे मंगळवारी निधन झाल्याने ही सभा तहकूब होणार असे जवळपास निश्चित होते.सभा सुरू झाल्यावर फर्नांडीस आणि माजी सहायक आयुक्त मुकुंद भोसले या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीपर बोलण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने भिमाले यांनी तहकुबी मांडली. तहकुबी वाचताना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी श्रद्धांजलीपर बोलून तहकुबीची घोषणा केली. तहकुबीचे वाचन सुरु असताना नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे, मंजूश्री खर्डेकर आणि अनुसया चव्हाण यांनी सभागृहात प्रवेश केला.फर्नांडीस यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, या सभेला अवघे चारच नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे नटनेते अरविंद शिंदे, शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका संगीता ठोसर यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका