शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गुंतवणूकीच्या आमिषाने ९ जणांना साडेचार कोटींचा गंडा; दरमहा ९ टक्के परतावा देण्याचे आमिष

By नितीश गोवंडे | Updated: November 17, 2023 17:45 IST

जर तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दुप्पट नफा, तसेच दरमहा आठ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले

पुणे : शेअर मार्केटमध्ये एक कंपनी ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याचे सांगून गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांना तब्बल ४ कोटी पन्नास लाखांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, वारजे पोलिस ठाण्यात निरंजन नवीनकुमार शहा (४२, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड) याच्या विरोधात महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, शहा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर एकनाथ कदम (४१,रा. बटरगल्ली, इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०२१ ते १६ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम आणि आरोपी शहा हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांची वारजे परिसरात भेट झाली होती. त्यावेळी शहा याने कदम यांना त्याची ग्लोबल ट्रेडर्स, प्राईड ग्रुप आणि गुडवीन ग्रुप या फर्म भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे जर तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दुप्पट नफा, तसेच दरमहा आठ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. निरंजन शहा याच्या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादी ज्ञानेश्वर कदम आणि त्यांच्या इतर साथीदारांनी तब्बल साडेचार कोटींची गुंतवणूक केली. मात्र काही कालावधीनंतर व्यवसायात नुकसान झाल्याचे कारण सांगून शहा यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. 

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी कदम यांनी त्यांच्या साथीदारांसह याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जाच्या चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा याच्या फर्ममध्ये अशाप्रकारे तब्बल अडीचशे लोकांनी गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक खंडागळे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाfraudधोकेबाजी