सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:08 PM2023-05-14T12:08:09+5:302023-05-14T12:08:17+5:30

शिक्षण क्षेत्रातील जून्या पिढीतील एका विद्वान शिक्षण तज्ञाला मुकलो असल्याची हळहळ शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होतीये

Former Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Ram Takwale passed away | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी रात्री ( दि. १३)  निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. नुकताच (११ एप्रिल) त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ११ एप्रिल १९३३ रोजी भोर तालुक्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९७८-१९८४ आणि इ.स. १९८८-१९८९ या वर्षी पुणे विद्यापीठात कुलगुरूपदी होते. त्यानंतरहीअनेक शिक्षण संस्था,संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले. सततच्या संशोधनपर व्रुत्तीमूळे अल्पावधीतच त्यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळख तयार झाली. शिक्षण क्षेत्रातील जून्या पिढीतील एका विद्वान शिक्षण तज्ञाला मुकलो असल्याची हळहळ शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Web Title: Former Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Ram Takwale passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.