माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:33 PM2022-02-05T14:33:27+5:302022-02-05T14:35:10+5:30

चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवड यांच्या अचानाक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली

Former Shiv Sena district chief Gajanan Chinchwade dies of heart attack | माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

Next

पिंपरी  :  शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय - ५२) यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे. आज सकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. लोकमान्य रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवड यांच्या अचानाक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सुरवातीला प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती.

Web Title: Former Shiv Sena district chief Gajanan Chinchwade dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.