शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादांसोबत; मुंबईत जाऊन केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 17:03 IST

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले

पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.  

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अजितदादांनी शपथ घेतल्यावर बारामतीत तर फटके वाजवून जल्लोष करण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते अजित पवारांबरोबर असल्याचे दिसून आले आहे. अशातच पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे यांनीसुद्धा अजितदादांची मुंबई येथे भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी काटे हे मताधिक्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिकीट देण्यात आले होते. नाना काटे अजित पवारांच्या जवळचे असल्याचीही पिंपरीत चर्चा आहे. कालच्या घडामोडीनंतर नाना काटे यांनी कार्यकर्त्यांसमेवत मुंबईला जाऊन अजित पवारांचे अभिनंदन केले आहे.  

 

बारामतीकरांनी फटाक्यांची केली आतिषबाजी

अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला होता. सुरवातीला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर पक्ष कार्यालय परीसरात सन्नाटा पसरला होता. मात्र,नागरीकांना या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.फटाक्यांची आतिषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. सुमारे अर्ध्या तासाुिन अधिक काळ सुरु असणाऱ्या फटाक्यांची फटकेबाजी अद्याप सुरुच आहे. अजितदादांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आम्हा बारामतीकरांनी मोठा आनंद झाला आहे. दादा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे बारामतीच नव्हे पुर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. सर्वांचा विकास होईल. दादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील,तो पक्ष मोठा होऊन वाढेल. आम्ही अजितदादांबरोबर आहोत असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सांगितले.    

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारBJPभाजपा