पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:27 IST2019-10-29T20:27:38+5:302019-10-29T20:27:59+5:30
दक्षिण उपनगरातील पाहिले उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे (वय ८१) यांचे मंगळवारी दुपारी १ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन
पुणे : दक्षिण उपनगरातील पाहिले उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे (वय ८१) यांचे मंगळवारी दुपारी १ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी झाला होता, पुणे महानगरपालिका चे १९८० ते १९९२ कालावधीत नगरसेवक म्हणून, तर १९८७ ते १९८८ या कालावधीत उपमहापौर म्हणून कार्यरत होते. सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद स्मारक समिती समितीचे ते संस्थापक अध्यक्ष होते, त्याचे हस्तेच स्वामी विवेकानंद स्मारकाची उभारणी करण्यात आली. भाजप महिला सरचिटणीस आशाताई बिबवे यांचे ते पती होते. लोकमत चे उपनगर बातमीदार पंकज बिबवे यांचे ते वडील होते. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.