शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

भाजपच्या माजी नगरसेवकाने बदला घेण्यासाठी दिली खुनाची सुपारी; पोलिसांनी उधळला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:12 PM

पुणे कॅन्टोमेंटमधील माजी नगरसेवकाने शिक्षा झालेल्या व कोविडमुळे कारागृहातून बाहेर आलेल्या दोघा कैैद्यांना सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देशस्त्रासह पकडलेल्या गुन्हेगाराच्या माेबाईलमधून उघडकीस आले कटकारस्थान

पुणे : पूर्व वैमनस्यातून पुणे कॅन्टोमेंटमधील माजी नगरसेवकाने बदला घेण्यासाठी शिक्षा झालेल्या व कोविडमुळे कारागृहातून बाहेर आलेल्या दोघा कैैद्यांना सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुपारी पूर्ण करण्यासाठी शस्त्रे जमविल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलिसांनी दोघांना ३ गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे व १ लाख २० हजार रुपये रोकड असा माल हस्तगत केला होता. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी करताना हा सुपारीचा प्रकार उघडकीस आला. यावरुन कोंढवा पोलिसांनी पुणे कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणारा व्यक्ती अशा चौघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजन जॉन राजमनी (वय ३८, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख (वय २७, रा. काळा खडक, वाकड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, पूर्व वैमनस्यातून बबलू गवळी याने २०१६ मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी विवेक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे पथकासोबत गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सुनील धिवार यांना बातमी मिळाली होती की, येरवडा कारागृहातून कोविड रजेवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहिम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खूनाची सुपारी घेतली आहे. त्यांच्याकडे पिस्तूले आहेत. राजमनी हा बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोटारसायकलवर बसून कोणाची तरी वाट पाहताना पोलिसांना दिसला. एक जण राजनला भेटायला आला. पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले. दोघांच्या अंगझडती राजन जवळ दोन पिस्तूले, ईब्राहीमकडे एक अशी ३ काडतूसे व गाडीच्या डिक्कीत १ लाख २० हजारांची रोकड मिळून आली.---------------------

संभाषणाच्या तपासणीत प्रकार उघडपोलिसांनी दोघांना ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण केल्याचे निदर्शनास आले. त्या संभाषणाची तपासणी केल्यावर हा खुनाची सुपारी देण्याचा प्रकार उघडकीस आला.

व्हॉटसॲप कॉलिंगवरुन उघड झाला कट

राजन राजमनी याला त्याच्यावरील खटल्यासाठी वकिलाला देण्यास पैसे नव्हते. विवेक यादव याला बदला घ्यायचा होता. ते एकाच भागात रहात असल्याने एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यातूनच पैशांसाठी राजन याने सुपारी घेतली.

व्हीके व व्हीके न्यू नावाने सेव्ह असलेले दोन्ही मोबाईल क्रमांक कॅम्प परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन उपाध्यक्ष विवेक यादव यांचे असल्याचे राजन याने सांगितले. राजन येरवडा कारागृहात वानवडी पोलिस ठाण्यातील खुनाच्या गुन्हयात २०१५ पासुन आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. मे २०२० मध्ये कोविड रजेवर बाहेर आला आहे. सुमारे ३ महिन्यापूर्वी विवेक यादव याने राजन याला घरी बोलावले. यादव राजन याला म्हणाला की, बबलु गवळी याचा खुन करायचा, पोलीस स्टेशन, कोर्ट, जेल सर्व मी बघेन, तुला अपिल व जामीनासाठी मदत करतो. तसेच तुझ्या घरच्यांनाही पैसे देखील देतो. त्यामुळे मी बबलू गवळीच्या खूनाची सुपारी घेण्यास तयार झालो असे राजन याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.

२१ जून रोजी विवेक यादव याने राजन याला मुंबई येथे भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी यादव याने त्याच्या एका वकिलाची भेट घडवून दिली. त्यानंतर यादव याच्या कारमध्ये बसून बबलू गवळी याला मारण्याचा प्लॅन रचला. त्यासाठी यादव हा राजन याला ५ पिस्तूले व ठरलेले पैसे देण्याचे कबूल केले. गवळीला कॅम्प परिसरात मारण्याचे दोघांच्या भेटीत ठरल्याचे राजन याने पोलिसांना सांगितले. कोणालाही प्लॅनचा सुगावा लागू नये म्हणून राजन व यादव हे दोघे केवळ व्हॉटस्अप कॉलवर बोलत असत. संभाषणाचे चॅटींग देखील डिलीट करण्याचे ठरले होते. त्यानंतर राजन याने त्याचा जेलमधील मित्र इब्राहिम याला गवळीच्या खूनाची माहिती देऊन त्याला सामील करुन घेतले.............

यादवच्या माणसाने पुरवली हत्यारे व पैसा३० जून रोजी विवेक यादव याने राजन याला व्हॉट्सअप कॉल करून पैसे व हत्यारे पोहच करतो असे सांगितले. त्यानुसार १ जुलै रोजी एकाने राजन याला ३ पिस्तूले, ७ राउंड व २ लाखाची रोकड रामटेकडी ब्रिजजवळ पोहच केली होती. परंतु, राजन व इब्राहिम हे गवळीचा गेम वाजविण्यापूर्वीच पोलिसांना याची माहिती मिळाली व त्यांचाच गेम झाला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBJPभाजपा