शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पुणे जिल्ह्याच्या आरोग्यासाठी 'टास्क फोर्स' समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:33 IST

जिल्ह्याच्या तळागाळात चांगली आरोग्य यंत्रणा आता पोहोचविणे शक्य होणार

ठळक मुद्देआरोग्य विभागाशी संबंधित सर्वांना एकत्र आणणार : दर मंगळवारी होणार आढावा बैठककोरोना व्हायरससंदर्भात जिल्हा प्रशासन सज्जबालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण तसेच साथींच्या आजारांचे मॉनिटरिंग या समितीद्वारे आजारांचे नियंत्रण करण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार

पुणे : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगल्या दर्जाची करण्यासाठी तसेच चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आरोग्य टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्वांना एकत्र आणण्यात आले असून दर आठवड्यात आरोग्य विभागात झालेले बदल, तातडीचे निर्णय, औषधपुरवठा आदी निर्णय ही समिती घेईल. यामुळे जिल्ह्याच्या तळागाळात चांगली आरोग्य यंत्रणा आता पोहोचविणे शक्य होणार आहे.जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच, अनेक केंद्रांत डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा औषधांचा तुटवडा असतो. यामुळे ग्रामीण भागात चांगली आरोग्य सुविधा मिळेल, याची शाश्वती नसते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनेक गैरप्रकारही सर्वसाधारण सभेत गाजले आहेत. नागरिकांना चांगले आरोग्य देणे, ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने नुकताच पदभार स्वीकारलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अकोला येथे राबविलेला आरोग्य टाक्स फोर्सचा उपक्रम आता जिल्ह्यातही राबविला जाणार आहे. यासाठी आरोग्य टाक्स फोर्स कमिटीची स्थापना करण्यात आली असून, आयुष प्रसाद हे तिचे अध्यक्ष आहेत. तर, जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी, मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी, तालुक्याचे आरोग्यसेवक, समन्वयक, रुग्णवाहिका, लॅब तपासनीस, आरोग्य विभागातील साधनांची दुरुस्ती करणारे आदींचा या समितीत समावेश आहे.या समितीद्वारे आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणी, औषधपुरवठा, प्राथमिक आरोग्य  केंद्रातील अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आदी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत्त. या सर्वांवर आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वत: लक्ष ठेवणार आहेत. ...........कोरोना व्हायरससंदर्भात जिल्हा प्रशासन सज्जचीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात केरळमध्ये ३ रूग्ण बाधीत आढळले आहेत. त्या पाश्वभूमीवर राज्यातही सतर्कतेचे आदेश दिले आहे. आरोग्य टाक्स फोर्सच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत  सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिले आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे चीन तसेच केरळ येथून येणा-या पर्यटकांची ‘हेल्थ हिस्ट्री’ तपासली जाणार आहे. तसेच या व्हायरस विषयी जनजागृती करण्यात येत आहे........बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण तसेच साथींच्या आजारांचे मॉनिटरिंग या समितीद्वारे करण्यात येणार आहे. दर आठवड्याला याची माहिती समितीमार्फत घेतली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, आजारांचे नियंत्रण करण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार आहेत.............आयुर्वेदिक सेवेविषयी जनजागृतीजिल्ह्यात जवळपास १ लाखांपैक्षा जास्त नागरिक आयुवैदिक औषधोपचार घेतात. विषेशत: वृद्ध नागरिक याचा लाभ घेतात. जिल्ह्यात असलेल्या आयुवैदिक दवाखान्यांची माहिती घेतली असून त्या ठिकाणी  येणाºया रूग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.............जिल्ह्यात चांगली आरोग्य यंत्रणा देण्यासाठी अकोला जिल्ह्यात ‘आरोग्य टाक्स फोर्स’ हा उपक्रम राबविला होता. तो उपक्रम आता जिल्ह्यातही राबविला जाणार आहे. यामुळे आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा चांगल्या होणार आहेत.  -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी. ......आरोग्य टाक्स फोर्स समितीद्वारे आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्वांना एकत्र आणून त्यांच्यातील समन्वय वाढविला जाणार आहे. यामुळे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे.       -प्रमोद काकडे, आरोग्य आणि बांधकाम सभापती

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यzpजिल्हा परिषद