शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:04 IST

मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका, सभा यांचे सत्र सुरू आहे. यातच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. यावरून राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर विरोधक टीका करताना दिसत आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये वाद पेटला. दोन्ही गटाच्या नेत्यांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. अशातच पुण्यात मनोज जरांगे पाटीलांच्या शांतता रॅलीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याचं दिसून आले आहे. आम्ही पक्ष, वाद विसरून समाजाचे काही देणं लागतो या उद्देशाने रॅलीत सहभागी झाले असल्याचे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची आज सारसबागेसमोरून शांतता रॅली निघणार आहे. ही रॅली सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कनला समारोप करणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवला आहे. राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत. तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारसबागेसमोर जमा होत आहेत.

या शांतता रॅलीत पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि मनसेचे राज्याचे सचिव आशिष साबळे हे एकत्र रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी विशाल धनवडे म्हणाले, आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली होत आहे. पुणे शहरातील सर्व पक्षांचे राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.   साबळे म्हणाले, आज समाजासाठी आम्ही पक्ष, वाद सगळं विसरून समाजाचे आम्ही काही देणं लागतो. या उद्देशाने सगळे जण एकत्र आलो आहोत. जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला पाठिंबा देण्यासाठी एक मराठा लाख मराठा म्हणून आम्ही सुद्धा या रॅलीत सहभागी झालो आहोत.  

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे