शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: लोकसभेला झालं गेलं विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:30 IST

निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल, आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका

बारामती : लोकसभा निवडणुकीत झालं गेलं विसरुन जाऊ, नव्या उमेदीने आपण कामाला लागु. आपल्यातील मतभेद, गटतट येणाऱ्या निवडणुकीत विसरावे लागतील. ही निवडणुक आपल्या दृष्टीने महत्वाची आहे, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतभेदाबाबत बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. एकमेकांबद्दल ‘काॅमेंट्स’ करु नका. त्याचे काही कारण नाही, असं म्हणत एक जीवाने विधानसभेच्या कामाला लागण्याचे सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

बारामती येथे आयोजित  बूथ कमिटी व कार्यकर्ता  मेळाव्याला संबंधित करताना पवार बोलत  होते. पवार पुढे म्हणाले, आपल्याला पुढील पाच वर्षासाठी आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी गरजेचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने सत्तेत नसतानाचे दिवस आठवा, माझे काही चुकत असेल तरी सांगा. पक्षाने सर्वांना पद मानसन्मान दिला. आता तुमची पक्षाला, पक्षाच्या उमेदवाराला गरज आहे. पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहचवा. आम्ही निवडणुकीपुरते येत नाही, आमची नाळ तुमच्याशी जोडल्याचे त्यांना सांगा, एखाद्याने प्रतिसाद न दिल्यास हात जोडून पुढे जावा. मतदारांसमवेत वैयक्तिक संवाद साधा. त्यांच्या अडचणी जाणुन घ्या. प्रभावी यंत्रणा राबवा. मतदान होइपर्यंत संस्था पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ सोडू नका. सर्व नियोजित ‘प्लॅन’ बाजूला ठेवा. आपल्यावर संस्थांची सामुहिक जबाबदारी आहे. निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याची खुणगाठ बांधा. एकमेकांच्या तक्रारी करण्याएवजी विधायक काय करता येइल ते पहा. राज्यात जाताना ताठ मानेने जाता यावे,ते काम तुमच्या हातात असल्याचे पवार म्हणाले.

निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. काही झाले तरी खचुन न जाता विश्वासाने निवडणुकीला सामोरे जा. आपले नाणं खणखणीत आहे. चुकीच्या प्रचाराला बळी पडण्याचे कारण नाही. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतील,असे देखील पवार म्हणालेे.

भांड्याला भांड लागतं, घराघरामध्ये  हे घडतं. जावाजावांच्यात किती पटतं मला माहिती आहे. अलीकडे भावाभावांच्यात ही किती पटतं मला माहिती आहे. अलीकडे चुलत्या पुतण्यातही ही किती पटतं हे मला माहिती आहे. आणि बहिण भावाचं ही किती पटतं हे ही मला माहित आहे. त्याच्यामुळेच मी लाडकी बहीण योजना काढली.? आणि सगळ्याच बहिणींना खुश केले,असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार कुटुंबातील सद्यस्थितीवर मिश्कील टीपणी केली.

लोकसभा, विधानसभेला बारामतीत आतापर्यंत असं कधी झालं नाही की..? पवार मंडळी, पवार परिवार आता जेवणं घालू लागला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावू लागला आहे. नवरात्र, ईद, गणेशोत्सव मंडळांना वर्गणी देऊ लागला आहे. भरभरून द्यायला लागला आहे. तर कुठे साड्या वाटप करू लागला आहे. असे काही प्रकार चालायला लागले आहेत. हे सर्व बारामतीकरांना नवीन आहे, अशी मिश्कील टीपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

कार्यकर्त्यांनी  'इगो' लांब ठेवावा. मला ही खूप इगो आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतोय. बऱ्याचदा महिलांकडून हातात राखी बांधताना दिसतोय. हात मिळवतो. माझ्या परीने जेवढं माणसात मिसळता येईल. तेवढा प्रयत्न करतोय. जनसमान यात्रा सुरू झाल्यापासून विरोधकांवर मी एकदाही टीका केली नाही. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. जनसन्मान यात्रेत देखील विरोधकांवर टीका केली नाही. केलेली विकासकामे आणि ‘व्हीजन’वरच बोलतोय,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता यांना आवाहन केले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार