leopard : पिंपरी पेंढार येथील दुरगुडपट येथे बिबट पकडण्यात वनविभागाला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:10 IST2025-07-02T11:09:30+5:302025-07-02T11:10:05+5:30
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती.

leopard : पिंपरी पेंढार येथील दुरगुडपट येथे बिबट पकडण्यात वनविभागाला यश
पिंपरी पेंढार : पिंपरी पेंढार ता. जुन्नर येथील दुरगुडपट येथे सहा वर्षे वयाचा नर बिबट पकडण्यात वनविभागाला यश आले, असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
सोमवारी (दि. ३०) सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अतिशय अवघड झाले होते.
परंतु या पकडलेल्या बिबट्यामुळे तात्पुरते का होईना, शेतकरी समाधानी झाले आहेत. या मोहिमेत वनपरिक्षेत्र लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक ज्ञानेश्वर साळुंके, रेस्क्यू मेंबर रोशन नवले, अमर भुतंबरे आदींचा समावेश होता.