शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पादचा:याच्या अंगावर घातली बस

By admin | Updated: August 3, 2014 00:28 IST

बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरच चालकाने पीएमपी बस घातल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साधू वासवानी चौकामध्ये घडली.

पुणो : बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरच चालकाने पीएमपी बस घातल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साधू वासवानी चौकामध्ये घडली. या अपघातात एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला असून, चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. 
गीता बाळासाहेब मुंगसे (वय 35, रा. आळंदी, केडगाव) असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर, माधुरी विनायक चिंचोरे (वय 23, रा. स्टेट बँकेसमोर, दौंड),  सुषमा सुरेश मोरे (वय 27, गणोश किनारा बिल्डिंग, चर्चजवळ पुणो) या गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी बसचालक मगबूल अब्दुल रहीम शेख (वय 5क्, रा. 311 कासेवाडी, राजीव गांधी हौसिंग सोसायटी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे.
गीता या बँक ऑफ बडोदाच्या रास्ता पेठ शाखेत कमर्चारी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर त्या बँकेत नोकरीला लागल्या होत्या. त्यांना चौदा वर्षाची एक मुलगी असून, दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या 18 वर्षाच्या मुलाचा पोहायला गेला असता मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी गीता या साधू वासवानी चौकातील बसथांब्यावर बसची वाट पाहत उभ्या होत्या, त्या वेळी शेख चालवीत असलेली पीएमपी बसथांब्याच्या दिशेने भरधाव आली. गीता यांना धडक देऊन या बसने रस्ता ओलांडत असलेल्या चिंचोरे आणि मोरे यांनाही जोरात ठोस मारली. या तिघीही गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 
दरम्यान, पीएमपी प्रशासनाने शेख याला निलंबित केले असून, त्याची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल.
शेख याने हा अपघात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे घडल्याचे पोलिसांना आणि पीएमपी प्रशासनाला सांगितले होते. परंतु, पीएमपी बसची यांत्रिक तपासणी केली असता बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. शेख याची एकूण 21 वर्षाची नोकरी झाली असून, त्याने किरकोळ व जखमी स्वरूपाचे 7 अपघात केल्याचे रेकॉर्ड आहे. त्याला वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात आलेले असतानाही त्याने भरधाव बस चालवून हा अपघात 
केला. (प्रतिनिधी)
 
चिंचोरे यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्या दौंडहून साधू वासवानी चौकातील फोटो फास्टच्या दुकानात कामाला येतात. रस्ता ओलांडत असताना त्यांना बसची धडक बसली. तर, गोखलेनगरमधील इंडस हेल्थ क्लबमध्ये नोकरी करणा:या मोरे यांच्या दोन्ही पायांना व हातांना जबर मार लागला आहे. त्यांना दोन मुली आहेत.