शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अन्न-औषध प्रशासन ढिम्मच

By admin | Updated: June 12, 2015 06:07 IST

खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे केला जातो. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार शहरात राजरोसपणे सुरू आहे.

संजय माने, पिंपरी खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे केला जातो. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार शहरात राजरोसपणे सुरू आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करू लागले असून, माहीत असूनही संबंधितांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच नागरिकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. हितसंबंध जोपासण्याच्या वृत्तीमुळे अधिकारी कारवाईचे धाडस दाखवू शकले नाहीत.खाण्यायोग्य नसलेला बर्फ लिंबू सरबत, उसाचा रस, तसेच अन्य खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे वापरला जातो. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्याचे काम ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केले. खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. ही बाब २७ मे रोजी ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या दिवशी बर्फ पुरवठादारांवर कारवाई करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे हाती घेतली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांनी स्पष्ट केले होते. परंतु, १५ दिवसांत त्यांच्या विभागाकडून अशी कारवाई करण्याचे पाऊल उचलले गेले नाही.खाण्यायोग्य नाही, औद्योगिक वापरासाठीचा बर्फ असे फलक बर्फ उत्पादन करणाऱ्या कंपन्या लावतात. परंतु, या कंपन्यांमधून बर्फ खरेदी करून तो कुल्फीवाले, रसवंतीगृह, लिंबू सरबतवाल्यांना पुरवठा जे लोक पुरवठा करतात, त्या पुरवठादारांवरच कारवाई करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे हाती घेतली जाणार आहे, असे शिंदे यांनी नमूद केले होते. मात्र, या विभागाकडून कारवाई होत नाही, हे माहीत असल्याने बर्फ पुरवठादारांना भीती वाटली नाही. त्यांनी बर्फ पुरवठा करण्याचे काम नियमितपणे सुरू ठेवले आहे. औद्योगिक वापराच्या बर्फाचे उत्पादन ज्या ठिकाणी होते, त्या बर्फ उत्पादक कंपन्यांमध्ये सकाळपासूनच बर्फाच्या लाद्या नेण्यासाठी टेम्पो, रिक्षा व अन्य वाहने रांगा लावत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरणे अयोग्य आहे. नागरिकांच्या आरोग्यास ते बाधक ठरू शकते, याच्याशी बर्फ उत्पादक, पुरवठादार, तसेच बर्फाचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करणारे यांना कोणालाही सोयरसुतक नाही. त्याचबरोबर त्यांच्यावर अंकुश ठेवणारे अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करत नाहीत. ज्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे ते अधिकारीच या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करु लागले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.