शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अन्न-औषध प्रशासनाला आली जाग

By admin | Updated: June 13, 2015 04:39 IST

स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून लोकमतने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब उघडकीस आणली.

पिंपरी : स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून लोकमतने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब उघडकीस आणली. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे काम करणाऱ्या अन्न निरीक्षकांनी सुरुवातीला दखल घेण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. कारवाईची मोहीम राबवली जाईल, असे शासकीय उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’ने याप्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांना आता कारवाई करणे भाग पडले आहे. कारवाईच्या हालचालींना वेग आला आहे. बर्फ खाणे अनारोग्यास कारणीभूत ठरणारे असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर बोटावर मोजण्याइतपत संख्येने असलेल्या खाण्याचा बर्फ उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात आली. शहरात खाण्याचा बर्फ उत्पादित तयार करणाऱ्या अवघ्या दोन कंपन्या आहेत, तर औद्योगिक बर्फ उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. संबंधित कंपन्यांची तपासणी करून अहवाल पाठविला आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून त्यांना नोटीस पाठविली जाईल, असे महापालिका हद्दीत काम करणारे अन्न निरीक्षक सांगतात. तपासणी करणे, अहवाल पाठविणे एवढीच कामे आमच्याकडे आहेत. पुढील कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविली की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही, असे अन्न निरीक्षक सांगतात.औद्योगिक वापराचा बर्फ हाच खाण्याचा बर्फ असा अनेकांचा समज आहे. लिंबू सरबत, उसाचा रस विक्री करणाऱ्यांनासुद्धा खाण्याचा बर्फ वेगळा असतो, याबद्दल माहिती नाही. औद्योगिक वापराच्या बर्फाचा खाद्यपदार्थांमध्ये होणारा वापर रोखण्यासाठी कारवाईचे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे. ते उचलले जात नाही. (प्रतिनिधी)