शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

चिंतेची बाब! आळंदीतील पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली; नागरिकांच्या आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 2:36 PM

तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी सलग दुसऱ्यांदा साबणाचा फेससारखी फेसाळली आहे...

भानुदास पऱ्हाड -आळंदी : नदीला आपण देवता मानतो. प्रत्येक नदी ही आपल्यासाठी पवित्र असते. जगभर मानवी संस्कृती नद्यांमुळे बहरली. जीवन देणाऱ्या या नद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारण तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी सलग दुसऱ्यांदा साबणाचा फेससारखी फेसाळली आहे.

एकीकडे कोरोनाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पिंपरी चिंचवड शहरातील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. हवा शुद्ध झाली असली तरीसुध्दा पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण मात्र कायम आहे. शहरातील विविध कंपन्यातील रासायनिक केमिकलयुक्त सांडपाणी, नागरी वस्तीतील मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत आहे. परिणामी इंद्रायणीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

गेल्या महिन्यांतही केमिकलच्या मिश्रणाने इंद्रायणी फेसाळली होती. विशेष म्हणजे वारंवार प्रशासनाकडे इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना कार्यान्वित केल्या जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. विविध उद्योगातील रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने इंद्रायणी प्रदूषित होत आहे. त्याचा फटका जलचर प्राण्यांना बसला आहे. त्याचबरोबर नदीकाठची शेती प्रदूषित पाण्यामुळे अडचणीत आली आहे. तसेच आळंदी शहरात व नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. 

एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे केले आहेत. उभारलेले प्रकल्प चालवण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आळंदी शहरातील नागरिकांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने इंद्रायणीला पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त करून देण्यासाठी 'नदी सुधार' योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Alandiआळंदीindrayaniइंद्रायणीriverनदीWaterपाणी