शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुण्याच्या मार्केटयार्डमधील फुल बाजार आता १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:58 IST

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसराई व जत्रा,यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असतात.

ठळक मुद्देफुल बाजार आवारात कमी जागेमुळे गर्दीची शक्यता लॉगडाऊन मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान 

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु फुल बाजार आवाराची जागा कमी असून, फुल बाजार सुरू झाल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने फुल बाजार १५ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी लग्नांचे व अन्य सर्व कार्यक्रमांचे मुहूर्त देखील पुढे ढकलण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे फुलांच्या मागणीत प्रचंड मोठी घट झाली आहे. त्यातच मार्केट याडार्तील फुलांच्या व्यापा-यांनी कोरोनाच्या धास्तीने फुल बाजार 31मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता 1 एप्रिल पासून तरी फुल बाजार सुरू होईल अशी अपेक्षा शेतकरीवगार्ला होती. परंतु गुलटेकडी मार्केट याडार्तील फुल बाजार आवारामध्ये जागेचा प्रश्न आहे. फुल बाजार पुन्हा सुरू केल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच बाजार समिती प्रशासनाने फुल बाजार पुढील 16 दिवसांसाठी म्हणजेच 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. --------लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसराई व जत्रा,यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फुलांना चांगली मागणी आणि दर देखील चांगले मिळतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्व कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम म्हणून गेल्या आठ- दहा दिवसांपासून फुल बाजार बंद असून, आता यामध्ये 15 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटाका बसला आहे.- राम ढमाले, खेड फुलांचे शेतकरी

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी