Pune Rain Updates | पुणे जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये येणार पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:20 IST2022-05-28T15:20:00+5:302022-05-28T15:20:01+5:30
हवामान विभागाने यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे

Pune Rain Updates | पुणे जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये येणार पूर
पुणे : पावसाळा तोंडावर आला असून, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. हवामान विभागाने यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात ९४ टक्के, तर जून ते ऑक्टोबर या काळात ९७ टक्के पाऊस झाला होता.
जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरावरील दौंड तालुक्यात सर्वाधिक १६ गावांना पुराचा धोका आहे. त्यानंतर इंद्रायणी नदीवरील मावळ, खेड, हवेली तालुक्यातील दहा गावांचा पूरप्रवण म्हणून समावेश होतो.
नदी तालुका गावांची संख्या
कऱ्हा बारामती १
निरा भोर ३
मुठा मुळशी, वेल्हा ९
हवेली, पुणे शहर
मुळा मुळशी, पुणे शहर ७
पवना हवेली, पुणे शहर ८
भामा खेड १
वेळ शिरूर १
घोड आंबेगाव, शिरूर ९
निना जुन्नर २
भीमा हवेली ७
शिरूर ९
दौंड १६
इंदापूर १
इंद्रायणी मावळ, खेड, हवेली १०
एकूण ८४
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात पुरामुळे व वीज पडल्याने झालेले मृत्यू
वर्ष मृत्यू
२०१५-१६ ५
२०१६-१७ ६
२०१७-१८ ७
२०१८-१९ ०
२०१९-२० ३७
२०२०-२१ २
२०२१-२२ ९
जिल्ह्यात उपलब्ध असलेले साहित्य
रेस्क्यू बोट : १६
इंजिन : १६
लाइफ जॅकेट : ८०
लाइफ बॉय : ८०
दोर : ३४
जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष
हेल्पलाइन क्र. ०२०-२६११४९४९