शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:42 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन उदयनराजेंनी संदेश लिहून उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, आज सांयकाळी विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत आज सायंकाळी उदयनराजे विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले होते. रात्री ते दिल्लीत पोहोचले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत. रात्री 8 वाजता पुणे विमानतळावरुन हे विमान दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर, दिल्लीला पोहोचल्यानंतर रात्री 9.30 वाजता उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या निवासस्थानी उतरले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबतही उदयनराजेंनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 

''आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठिशी राहिल, हीच अपेक्षा, असे म्हणत उदयनराजेंनी भाजपा प्रवेशाची घोषणा केली. आता, लढाई रयतेच्या विकासासाठी फक्त अशा आशयाचे बॅनर लावून गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयंमत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश होणार असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले.  खासदार उदयनराजे यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजेंनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे. पवार यांच्यासोबतच्या भेटीवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचे वृत्त नाकारले होते. उदयनराजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला आले होते, असे मुंडेंनी सांगितले होते. मात्र, मुंडेंचा आशावाद फोल ठरला असून उदयनराजे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPuneपुणेairplaneविमान