Five shops burnt due to short circuit in Alephata; Loss of Rs. 71 lakhs | आळेफाटा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने भस्मसात; ७१ लाखांचे नुकसान 

आळेफाटा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने भस्मसात; ७१ लाखांचे नुकसान 

आळेफाटा: येथील बसस्थानकासमोर असलेल्या पाच दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे ७१ लाखांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.

या आगीत रतनलाल जोशी यांचे हिंगलाज स्वीट मार्टचे १२ लाख, अमित बाम्हणे यांचे रुद्र ट्रेडिंग कंपनीचे १० लाख, हितेश सोनवणे यांचे जय गणेश हार्डवेअरचे ४० लाख, नीलेश रायकर यांचे स्वस्तिक हेअर कटिंग सलूनचे ७ लाख, तसेच योगेश बाम्हणे यांचे गणेश फ्रूट कंपनीचे २ लाख असे एकूण ७१ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

आळेफाटा येथे वरील पाच दुकानांना बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर ही आग विझविण्यासाठी जुन्नर नगर पालिकेचा व राजगुरुनगर पालिकेचे बंब बोलविण्यात आले. त्यांना ही आग विझवण्यात तब्बल तीन तास लागले. आग मोठी असल्याने ती आटोक्यात येइपर्यंत पाचही दुकानामधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. ही आग शाॅकसर्किट झाल्यामुळे लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Five shops burnt due to short circuit in Alephata; Loss of Rs. 71 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.