पहिल्याच पावसाने शहरात साचले पाणी

By Admin | Updated: June 22, 2015 04:39 IST2015-06-22T04:39:18+5:302015-06-22T04:39:18+5:30

मॉन्सून दाखल होऊनही पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रविवारी पावसाच्या जोरदार सरींनी चिंब भिजवून टाकले. सकाळपासून भुरुभुरु पडत असलेल्या पावसाने दुपारनंतर

The first rain brings water to the city | पहिल्याच पावसाने शहरात साचले पाणी

पहिल्याच पावसाने शहरात साचले पाणी

पुणे : मॉन्सून दाखल होऊनही पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रविवारी पावसाच्या जोरदार सरींनी चिंब भिजवून टाकले. सकाळपासून भुरुभुरु पडत असलेल्या पावसाने दुपारनंतर
दमदार हजेरी लावली. सायंकाळपर्यंत शहरात
३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती़ या पावसाने शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. येत्या २४ तासांत शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन महिने अगोदरपासूनच महापालिका प्रशासनाने पावसाळीपूर्व कामाची तयारी सुरू केली होती. महापौर, सभागृह नेते, स्थायी समितीच्या अध्यक्ष यांनी बैठकांवर बैठका घेत पावसाळी कामांचा आढावा घेतला होता. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी करून तिथे पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
म्हात्रे पुलाजवळील महादेव मंदिराजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यातून जाण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून चालत जावे लागले. मेंहेंदळे गॅरेजजवळ पावसाळी गटारांमध्ये प्लॅस्टिक अडकल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होऊन मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सातारा रस्ता परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. हॉटेल ब्ल्यू डायमंड परिसरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. येरवड्यात खोलगट भागामध्ये पाणी साचल्याचे प्रकार घडले.

Web Title: The first rain brings water to the city