शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

भारतातील पहिलीच घटना; पुण्यात एक किडनी असलेल्या ३ वर्षाच्या श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 3:39 PM

गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया, डॉक्टरांचे यशस्वी उपचार

ठळक मुद्देशस्त्रक्रियेनंतर रॉलीमध्ये चांगले बदल झाल्याचे आमच्या लक्षात आले. तो आता मुक्तपणे फिरू शकतो

पुणे : रॉली या ३ वर्षांच्या श्वानाला गेल्या एक वर्षापासून हर्नियाचा त्रास होता. गेल्या ३ महिन्यांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जन्मत: एकच किडनी असलेल्या रॉलीला अलीकडेच हर्नियाचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्याने जन्मत:च एक किडनी असलेल्या रॉलीवर दुर्मीळ लेप्रोस्कोपिक हर्निक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अशा पध्दतीच्या शस्त्रक्रियेची ही भारतातील पहिलीच घटना आहे.

रॉलीला उलटी होणे, अतिसार, पाठीत कळ येणे, ओटीपोटात दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे आणि सतत लाळ गळणे अशी लक्षणे दिसून येत होती. त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आणण्यात आले. गॅस्ट्रोस्कोपी, सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या केल्यानंतर रोगाचे निदान झाले. हार्मोनिक स्केलपेल, लेप्रोस्कोपिक सेट आणि लिव्हर रीट्रॅक्टर यासारख्या विविध प्रकारच्या साधनांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रॉली लवकरच बरा झाला. शस्त्रक्रियेनंतर रॉली १५ दिवस द्रव आहाराचे सेवन करत असल्याची माहिती डॉ. नरेंद्र परदेशी यांनी दिली. डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखालील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिक येथील डॉ. शशांक शाह यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासोबत डॉ. ज्योती परदेशी, सुधींद्र हरीभत, रीना हरिभत, ऋतुजा काकडे, शिल्पा पुजारी यांची टीम कार्यरत होती.

शस्त्रक्रियेनंतर रॉलीमध्ये चांगले बदल झाल्याचे आमच्या लक्षात आले. तो आता मुक्तपणे फिरू शकतो. या शस्त्रक्रियेने आम्हाला पाळीव प्राण्याचे देखील चांगले पालक नक्कीच होता येते, याची जाणीव करून दिली. प्राण्यांनासुद्धा मनुष्यांसारखाच आजार किंवा वेदना होतात, परंतु आपल्यासारखे ते व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच, जवळच्या पशुवैद्यांना भेट देऊन नियमित तपासणी करणे आणि त्यांना अशा आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी त्यांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, असे रॉलीचे पालक दिनेश कथुरिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतdocterडॉक्टरdogकुत्रा