शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  : आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:14 PM

गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत.

चाकण : दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला.या घटनेत चुलत भाऊ मोठ्याने ओरडल्याने पिस्टल मधील गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.                     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना शुक्रवारी ( दि. २१ ) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण गावात घडली. याबाबत शांताराम दत्तात्रय चव्हाण ( वय ३३ वर्षे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर ( वय २६ वर्षे ) यास अटक करण्यात आली आहे.                      याबाबतची अधिक माहिती अशी कि, अपघातात झालेल्या आरोपीच्या गाडीचे नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून मांडेकर याने आपल्या कडील गावठी कट्टा हा फिर्यादी चव्हाणच्या डोक्यास लावला. त्यावेळी फिर्यादीचे सोबत असणारे चुलत भाऊ गणेश चव्हाण मोठ्याने ओरडल्याने फिर्यादीने आरोपीचा हाताला धक्का दिल्याने पिस्टलमधून गोळी हवेत फायर झाली. आरोपीच्या हातातून गावठी कट्टा हिसकावून घेत असताना आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अटक करण्यात आली असून खेड न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकFiringगोळीबार