शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार अन् दगडफेक; जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:04 IST

शितल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला याचे उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे.

- किरण शिंदे

पुणे - घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने त्यांनी केलेल्या गोळीबारात आणि दगडफेकीत जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर परिसरात ही घटना घडली. शितल अक्षय चव्हाण (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हॉटेल आहे. या हॉटेललगत असणाऱ्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण, पत्नी शितल चव्हाण आणि कुटुंबीय राहत होते. अक्षय त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. दरम्यान शुक्रवारी सकाळी सहा ते सात तरुण त्या ठिकाणी कारमधून आले. तेथील मोकळ्या जागेत ते लघुशंका करत होते. सुरक्षारक्षक असणाऱ्या अक्षय चव्हाण यांनी त्याला हटकले. यावरून दोघात हाणामारी सुरू झाली. आरोपींनी चव्हाण कुटुंबीयावर दगडफेक केली. इतकच नाही तर आरोपींनी चव्हाण कुटुंबीयांच्या दिशेने गोळीबार देखील केला. 

या गोळीबारात आणि दगडफेकीत शितल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शितल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला याचे उत्तर  मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे. बुधवारी शितल यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय