शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे अग्निशामक केंद्र धूळ खात

By admin | Updated: May 18, 2015 05:47 IST

मार्केट यार्ड परिसरातील मोक्याच्या जागेवर अग्निशामक केंद्र उभारले आहे. मात्र, महापालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव व प्रशासनाच्या

पुणे : मार्केट यार्ड परिसरातील मोक्याच्या जागेवर अग्निशामक केंद्र उभारले आहे. मात्र, महापालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव व प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे सहा महिन्यांपासून केंद्राचा ताबा घेण्यात आलेला नाही. एका बाजूला मार्केट यार्ड परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असताना अग्निशामक केंद्र धूळ खात पडल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीतील १९८७च्या प्रारूप विकास आराखड्यात गंगाधाम चौकातील सर्व्हे नंबर ५७८ येथील १० हजार चौरस मीटर जागेवर अग्निशामक केंद्राचे आरक्षण होते. मात्र, महापालिकेने अनेक वर्षे जागेचा ताबा न घेतल्याने जागा मालकांनी आरक्षण बदलाचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आरक्षण बदलाला विरोध केला. ‘लोकमत’ने ‘आरक्षण बदलाचा घाट’ या वृत्तमालिकेद्वारे या विषयाला वाचा फोडली. त्यानंतर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले होते. स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनी जागेवर पाहणी करून प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला स्थगिती दिली. त्यानंतर आयुक्त महेश पाठक यांनी संबंधित विकसकाला आर-७ नुसार अग्निशामक केंद्र विकसित करण्यास सप्टेंबर २०१२ मध्ये मान्यता दिली होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अग्निशामक केंद्र उभारणीचे काम मार्च २०१३ मध्ये सुरू झाले. विकसकाने दीड वर्षात केंद्राची उभारणी केली. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाला केंद्र ताब्यात घेण्याचे पत्र दिले आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे अग्निशामक केंद्र ताब्यात घेण्याची कार्यवाही झालेली नाही. स्वारगेट ते कात्रज या भागात अनेक झोपडपट्ट्या आहेत. मोठी लोकसंख्या परिसरात निवासासाठी असूनही एकही अग्निशामक केंद्र नाही. गेल्या महिन्याभरात मार्केट यार्ड परिसरात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन अग्निशामक केंद्र ताब्यात घेण्यासाठी गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिकाच्या भूमी-जिंदगी, भवन व अग्निशामक विभागातील समन्वया अभावी कार्यवाही ठप्प आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर विषयांवर गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)